ग्रामसभा न घेण्याच्या निर्णयाला ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा जाहीर पाठिंबा
वांजरगाव प्रतिनिधी – किरण गंगुले
जळगाव जिल्ह्यातील शिवरे (ता. पारोळा) येथे ग्रामसभेचे शासकीय कर्तव्य बजावत असताना कर्तव्यदक्ष ग्रामसेवक स्व. श्री. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ग्रामसेवक संघटनेने दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत रास्त असून, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन (र. नं. एनजीपी ४५११) या निर्णयाला जाहीरपणे पूर्ण पाठिंबा देत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांना तात्काळ आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी तसेच स्व. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे, तालुकाध्यक्ष राजुभाऊ चंदनशिव, तालुका कार्याध्यक्ष कांताराव भाऊ राऊत, उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ बारसे, तालुका सचिव अनिल भाऊ बागुल, तालुका संघटक गणेश देवकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख सुरज भाऊ शिंदे, तालुका सरचिटणीस किरण भाऊ गंगुले, कोषाध्यक्ष सागर ठोंबरे, सहकारी अध्यक्ष दिपक तांबे, सहसचिव नानासाहेब उफाडे, संघटक कैलास जाधव, तालुका संघटक श्रीमती रेखाताई दिवेकर, सहसंघटक श्रीमती योगिता कांबळे, तालुका मार्गदर्शक शिवाजी ठोंबरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.








