ओपन कराटे चॅम्पियन स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
जिल्हा प्रतिनिधी उज्वल जैस्वाल
शा. प्र. दि. 19 ऑगस्ट राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर चा विद्यार्थ्यांचा संघ छत्रपती संभाजी नगर येथे युथ पॉवर स्पोर्ट्स अकादमी यांचे द्वारा आयोजित ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला होता. यात चार मुले व एक मुलगी असे एकूण 5 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात चुरशीच्या लढतीत एक सुवर्ण व चार रजत पदक मिळवून चमकदार कामगिरी विद्यार्थ्यांनी केली. यात हर्षल राजू बिलारी याने सुवर्ण पदक जिंकले तर देवयानी किशोर सिरसाट, नैतीक मर्दानसींग कव्हाळ, स्वप्निल गजानन वाघ व आर्यन रवींद्र सिरसाट यांनी रजत पदक जिंकले. अतिशय चुरशीच्या झालेल्या सर्व लढतीत दमदार कामगिरी करत उपस्थित प्रेक्षकांची मनं विद्यार्थ्यांनी जिंकली. या विजयाबरोबर द्वितीय ट्रॉफी मिळवण्यात संघाला यश मिळाले.
या मिळालेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके व प्राचार्य किशोर सिरसाट यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामागे शाळेचे कोच भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली.








