मेंढपाळाचा मुलगा झाला क्लास वन ऑफिसर; लोणी खुर्द येथील सुनील राऊतची उत्तुंग भरारी
प्रतिनिधी : हिना उबाळे
राहाता : इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले पाहिजे, नामांकित कोचिंग क्लास जॉईन केले पाहिजे, आणि कौटुंबिक स्थिती उत्तम पाहिजे, तरच प्रशासकीय सेवेत उच्च पदावर पोहोचता असा असलेला समाजातील ब्रह्म, राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील मेंढपाळाचा मुलगा सुनील नंदू राऊत यांनी दूर केला.
दुसऱ्याच प्रयत्नात क्लास वन ऑफिसर बनण्याचे स्वप्न पूर्ण करून तो प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या युवकांसाठी आदर्श बनला आहे.
लोणी खुर्द पिंपरी निर्मळ या रस्त्यावरील राऊत वस्तीवर राहणारे नंदू राऊत यांचे शेतकरी कुटुंब दररोज मेंढ्या घेऊन भटकंती करीत. बऱ्याचदा घरापेक्षा कुणाच्यातरी शेतात राहून उदरनिर्वाह करणारे नंदू राऊत स्वतः अशिक्षित, मात्र आपल्या वाट्याला आलेलं जगन दोन्ही मुलांना येऊ नये म्हणून, ऊन, वारा, पाऊस, याची तमा न बाळगता मुलांना उच्च शिक्षित बनवण्याचा निर्णय या पती-पत्नीने केला. त्यांच्या कष्टाला यश आले. एक मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन इंजिनियर बनला, तर दुसरा थेट प्रशासकीय सेवेत क्लास वन ऑफिसर. दोन्ही मुलांचे यश त्यांच्या डोळ्यात मावेना इतके मोठे.
मुलगा कोणत्या पदावर गेला हेही सांगता येत नाही फक्त सरकारमध्ये साहेब झाला एवढेच माहिती.
सुनील राऊत यांनी मे 2026 मध्ये दिलेल्या महाराष्ट्र अ राजपत्रित सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर झाला त्याला 30 वी रँक मिळाली. ही, एम पी एस सी ची परीक्षा त्याने, दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली सब रजिस्टर ग्रेड वन, इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प या पदावर, त्याची वर्णी लागली आहे.
सुनील राऊत यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरी निर्मळ येथील राऊत वस्ती येथील शाळेत झाले, लोणीच्या पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात बी टेक ऍग्री साठी प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना इतर मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याने ही तयारी सुरू केली. वशिष्ठ विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन मिळू लागले, जे विद्यार्थी एमपीएससी उत्तीर्ण झाले तेच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करू लागले कोणताही माकडा कोचिंग क्लास लावण्याची गरज पडली नाही, व इतर गोष्टी उपलब्ध असल्याने, सुनील ने त्यांच्या मदतीने, परिश्रम घेताना मनात न्यूनगंड बाळगला नाही.
मात्र यामागे आई-वडिलांचे प्रचंड कष्ट आहेत काळ बदलला आहे. आता कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारी राहिलेली नाही. ज्याच्यात गुणवत्ता आहे त्याच्यासाठी हा सुवर्णकाळ आहे. सुनील चे यश गरीब कुटुंबातील बुद्धिमान मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.








