दावणगीर गावामध्ये अवैध दारू विक्री बंद करण्याचा ग्रामसभेचा ठराव
ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय; मरखेल पोलिस प्रशासनाला निवेदन
प्रतिनिधी : संघपाल मदने
देगलूर तालुक्यातील मरखेल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दावणगीर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झालेल्या ग्रामसभेत गावात सुरू असलेली गावठी व देशी दारूची अवैध विक्री तात्काळ बंद करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून गावात अवैध दारूविक्री सुरू असून, गावातील शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी दारूच्या आहारी जाण्याची शक्यता वाढत असून, व्यसनामुळे तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होण्या बरोबरच त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे गावातील अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
ग्रामसभेत संघपाल मदने पत्रकार,ऋषिकेश राजुरेड्डी संगगगिरे, ज्ञानेश्वर सगनगिरे, प्रसन्नजीत कांबळे पत्रकार,यांनी अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव मांडला, तर दिलीप रेड्डी गोविंद रेड्डी मुसगे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने ठराव मंजूर केला. त्यानंतर सदरील ठरावाची प्रत प्रशासक सरपंच गंगाबाई मारोती गायकवाड व प्रपुलं खंधारे ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य इस्माईलसाब शेख,यांच्या स्वाक्षरीनिशी मरखेल पोलिस ठाण्यात देण्यात आली.
मरखेल ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर यांच्या उपस्थितीत पोलिस जमादार परशुराम इंगोले यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन सादर केले.यावेळी दावणगीरचे पोलीस पाटील मधुकर सगनगिरे, संदिप गायकवाड,राम मोरेवाड,तानाजी बामणे, विशाल मदने, संदिप टोके,हणमंतरेड्डी कोत्तावाड, रामदास बंदामे, मारोती पारसे, अजय आवले, सविनय टोके, गोविंद कुंभार,शंकर कांबळे, संदीप मिट्टेवाड,अनेक गावातील तरुण उपस्थित होते. गावातील अवैध दारूविक्रीवर तातडीने कारवाई करून ती पूर्णपणे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.








