तालूकास्तरीय भाषण स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर चा विद्यार्थी प्रथम
प्रतिनिधी : उज्वल जैस्वाल
दि. 21 ऑगस्ट राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर च्या विद्यार्थ्यांने तालूकास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्त असे की, राज्य विज्ञान शिक्षण संस्था आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2026 अंतर्गत भारतीय उर्जा क्षेत्र 2047: भवितव्य (संधी) आणि आव्हाने या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन शिक्षणाधिकारी यांचे वतीने भारत विद्यालय बुलढाणा येथे करण्यात आले होते. यात शाळेचा इयत्ता 8वीचा विद्यार्थी मो. अयान मो. जावेद सहभागी झाला होता. यात अयानने तंत्रज्ञानाच्या मदतीने अप्रतिम भाषण व सादरीकरण केले व प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला शिक्षण विस्तार अधिकारी नेमाने मॅडम यांचेहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी श्री शिवाजी जु. कॉलेज चे योगेश भोंडे सर, भारत विद्यालयाचे सिद्धभाती सर, उर्दू हायस्कूल बुलढाणा चे इमरान सर, मिलीटरी स्कूल चे राजू घोंगडे सर, भारत विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर व रामेश्वर काळवाघे सर आदींची उपस्थिती होती. संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांनी अयानचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या भाषणासाठी शाळेचे शिक्षक विशाल काळवाघे व प्राचार्य किशोर सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.








