दादी प्रकाशमाणी पुण्यतिथी निमित्त राहुरीत रक्तदान शिबीर
प्रतिनिधी : राहुरी
राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त विश्व बंधुत्व दिवस तथा सोमवार दि. २४ ऑगष्ट २०१६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राहुरीच्या राजयोग भवन ब्रम्हाकूमारीज यांच्या वतिने देण्यात आली.
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी विश्व बंधुत्व दिवसाचे आयोजन करण्यात येते. ब्रम्हाकूमारीज यांच्या समाज सेवा प्रभागाच्या वतीने राहुरी येथील राजयोग भवन येथे सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरात राहुरी शहर व तालुक्यातील युवा युवती तरुण व जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राजयोग भवनच्या ब्रम्हाकूमारी नंदा दीदी यांनी केले आहे.








