जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त किनवटमध्ये बैठक
प्रतिनिधी -मार्कंडेय सिरमवार
किनवट : जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त किनवट शहरात वी.आर. गार्डन येथे ज्येष्ठ फोटोग्राफ के मूर्ती , उमाकांत नारलावार, फुलाजी गरड, शेषेराव घिमेकर, बापूराव भंडारे,उल्हास दिसेवार यांच्या उपस्थितीत फोटोग्राफर व छायाचित्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी छायाचित्रण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली
फोटोग्राफीच्या माध्यमातून समाजातील विविध घटना, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक क्षण जतन करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात छायाचित्रकारांनी आधुनिक साधनांचा योग्य वापर करून दर्जेदार छायाचित्रण करावे, असे आवाहन करण्यात आले.
जागतीक छायाचित्र दिनानिमित्त आयोजीत बैठकीत फोटोग्राफर लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या आधुनिक युगात छायाचित्रण व्यवसायासमोर मोठी आव्हाने उभी राहिली असून पूर्वीसारखी मिळकत उरलेली नाही पंरतु परिस्थिती किती ही बदलली तरी ज्यांच्याकडे खरी कसब तांत्रिक कौशल्य आणि छायाचित्रणाची आवड आहे ते खरे फोटोग्राफर आज ही व्यवसायात आत्मविश्वासाने टिकून आहेत असे प्रतिपादन जेष्ठ फोटोग्राफर लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांनी केले..यावेळी किनवट शहरातील सर्व फोटोग्राफी आदी उपस्थित होते…!!!
बैठकीस स्थानिक फोटोग्राफर, पत्रकार आणि छायाचित्रण क्षेत्राशी संबंधित नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा देत छायाचित्रकारांच्या कार्याचे कौतुक केले.








