तेल्हारा येथील मिलिंद बुद्ध विहारात 11व्या दिवशी धम्मग्रंथाचे पठण
प्रतिनिधी: सदानंद मोरे
अकोला: तेल्हारा येथील मिलिंद नगर बुद्ध विहार मध्ये वर्षावास, प्रवचन मालिका, ग्रंथ पठणाचे औचित्य साधून शनिवार दि. 8 ऑगस्ट 2026 ला रात्री 9 वा. ते 10 वा. या कालावधीत पूज्य भंते ज्योती पुत्र यांनी 11 व्या दिवशी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील राजपुत्र आणि त्याचा सेवक छन्न परतला शोकाकुल कुटुंब, या विषयावर श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मिलिंद मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते तथा श्रद्धावान बौद्ध उपासक, उपासिका, बालक बालिका यांची आवर्जून उपस्थिती होती.








