नगरसुल सह परीसरातील जलस्रोत साठे कोरडे दुष्काळाचे सावट शेतकरी चिंताग्रस्त
पावसळ्याचे तिसरा महिना ही कोरडा परिणामी तर उत्तर- पूर्व भागातील बंधारे कोरडे
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
येवला (राजापूर) : तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असताना तालुक्याला व तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाल अद्यापही पर्जन्यमान खूप कमी आहे. जून, जुलै, ऑगस्ट अर्धा संपला शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली परंतु पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली जेमतेम रिमझिम पावसाने आज पर्यंत पिकांनी तग धरून उभे आहे. उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता परंतु पर्जन्यमान नसल्याने पिकांचे भवितव्य धोक्यात असल्याचे चित्र जाणवत आहे .विहिरींना जेमतेम पाणी उतरले असून शेतशिवाराला पाणी देत असताना अनेकांच्या विहिरी उपसत आहे त्यात पावसाचे दिवस संपत चालल्याने शेतकरी राजा चिंताचूळ झालाय कारण भविष्यात शेतीलाही पाणी मिळणार नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनणार आहे. या तालुक्याच्या दुष्काळाला मात करण्यासाठी शेतीला पाणी उपलब्धतेसाठी स्वर्गीय माजी आमदार जनार्दन पाटील यांनी पुणेगाव -दरसवाडी -डोंगरगाव पोहोच कालव्याची रोजगार हमीतून निर्मितीसाठी प्रयत्न केले. परंतु निधी आभावी हा कालवा तसाच पडू होता.
भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या कालव्याला गती देऊन पाठाचे काम पूर्ण करून पाण्याचा स्रोत उपलब्ध करण्यासाठी त्यांनी मांजरपाडा प्रकल्प उभारून बोगद्याद्वारे पाणी उपलब्ध केले कालव्याला कॉंक्रिटीकरण करून या कालव्याद्वारे थेट डोंगरगाव पर्यंत याही वर्षी पाणी आणले पाणी पूजन झाले आणि पाणी बंद झाले पाणी आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण पाणी बंद झाल्या नंतर जनतेत नैराश्य निर्माण झाले परंतु या कालव्याचे पाणी मागेच फोडून घेतल्याने प्रश्न गंभीर निर्माण झालाय तरी भुजबळ साहेबांनी पुणेगाव काल्यातून पाणी मागणी करून उत्तर पूर्व भागाला पुरवावे अशी मागणी जनता करीत आहे. पुणेगाव दरसवाडी भागातील नद्यातून व सांडव्यातून वाया जाणारी पाणी कालीवाद्वारे या दुष्काळी भागाला मिळवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी जनता ठेवता येईल.
नगरसुल परिसरातील सर्व बंधारे व वसंत बंधारा, तांबडधोंडा बंधारा,नांरदी नदीवरील बंधारे, लेडींनाला बंधारा, धनामाळी बंधारा मांजरपाडा काल्याच्या पाण्याणे भरविण्याची मागणी सुभाष निकम अध्यक्ष विधानसभा शरद पवार गट यांनी केली आहे.
येवला तालुक्याल उत्तर पूर्व भागाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी हा पुणेगाव- दरसवाडी -डोंगरगाव पोहच कालवा नवसंजीवनी देणारा असून तालुक्यातील या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भुजबळ साहेबांसारखा दूरदृष्टी असणारा नेता लाभल्याने खरोखर या उत्तर पूर्व भागाचा विकास होईल. संजय पाटील माजी सभापती कृ बा समीती येवला.
आदरणीय भुजबळ साहेबांनी साकारलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी ९ ऑगस्ट पासून म्हणजे गेली १० दिवस येवला तालुक्यात आहे. अजूनही पुढे १५ दिवस पाणी राहील अशी अपेक्षा आहे. आदरणीय भुजबळ साहेब,आदरणीय समिरभाऊ सर्वांनाच पाणी कसे मिळेल याचा सतत आढावा घेत आहेत.अनेक बंधारे भरून झालेत. राहिलेले बंधारे देखील भरून होतील. शेतकरी भावांनो सगळीकडे पाऊस उघडलेला असताना मांजरपाडा चे पाणी तालुक्यता वाहते आहे हे आपले भाग्य आहे.पाणी सर्वांनाच भेटणार आहे. फक्त सर्वांनी संयम धरला पाहिजे. डॉ मोहन शेलार पाणी आंदोलक.








