शनिवार, रविवार ठरला शेतकर्यासाठी दु:खाचा डोंगर एकाच ठिकाणी दोन बैलांचा मृत्यू
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमुर: घराकडुन शेती कामासाठी बैलबंडी घेऊन जात असताना. काही अंतरावर शनिवारी अकरा वाजताच्या दरम्यान विद्युत प्रवाहने बैलाच्या जागीच मृत्यू झाला. उजव्या बाजूच्या जोडीतील एक बैल मृत्युमुखी पडला. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी अन्य एका शेतकऱ्याच्या बैलाचा जीव गेला. सलग दोन दिवसांत एकाच ठिकाणी दोन बैलांचा ऐन हंगामात मृत्यू झाला. घटनास्थळाजवळच महावितरणचे लोखंडी पोल होते आहे. इन्सुलेटर फुटल्याने लोखंडी पोल आले विद्युत प्रवाह होत आहे. अर्थिगचा धक्का लागून बैलांचा मृत्यू झाला असावा, असा संशय गावकऱ्यांमध्ये बळावला. दरम्यान, महावितरणच्या अभियंत्याने गावकऱ्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. केवळ वीज कर्मचारी दोन तास विलंबाने घटनास्थळावर पोहोचला. नंतर पशुधन विभागाचे अधिकारी, पोलीस विभाग आणि शेवटी तीन ते साडेतीन तासाच्या विलंबाने महावितरण भिवापूरचे अभियंता कारगावकर पोहोचले. नागरिकांनी शेतकऱ्यांप्रती अनास्थेविरूद्ध अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. विलंबाविषयी विचारल्यावर अधिकाऱ्यानी आज रविवारी सुट्टीचा दिवस होता, असे सांगण्यात आले.
प्राप्त महितीनसार, विनोद सुखदेव काकडे व देवाजी उदेभान काकडे रा. पांढरवाणी यांच्या मालकीची बैल शनिवारी व रविवारी सलग दोन दिवसात मृत पावले. विनोद काकडे हे शनिवारी (ता. २२) शेतामधून गावाकडे येत होते. झीलबोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखडी पोल जवळ त्यांचा एक बैल तडकाफडकी मृत्युमुखी पडला. दुसऱ्या दिवशी देवाजी काकडे हे बैलबंडीने शेताकडे जात होते. त्याच ठिकाणी अचानक बैल जागीच मृत्यूमुखी पडला. दोन्ही बैलांच्या मृत्यूचे घटनास्थळ एकच असून, घटनास्थळालगतच विद्युत विभागाची डीपी आहे. डीपीतील अर्थिंगचा धक्का लागून बैलांचा मृत्यू झाल्याचा आरोप दोन्ही शेतकरी आणि ग्रामस्थांनी केला आहे. विद्युत विभागाविषयी ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सध्या स्थितीत विजेमध्ये बिघाड आढळला नाही घटनेविषयी संशय आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असे भिवापूर महावितरणचे अभियंता कारगावकर यांनी सांगितले.
बैलांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात एकीकडे महावितरणचे अधिकारी विजेमध्ये कोणताही बिघाड नसल्याचे सांगत असून गावकरी मात्र महावितरणच्या ईशुलेडर फुटल्या लोखंडी पोलाला शॉक बैलांचा मृत्यू होत असल्याचे सांगत आहेत. दोन बैलांच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. यामुळे महावितरण व गावकरी आमने-सामने उभे ठाकले आहेत. दरम्यान अभियंत्यांना येईपर्यंत शवविच्छेदन न करण्याचा गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय मागे घेतल्याने सायंकाळी दोन्ही बैलांचे पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले.








