युवा शेतकरी रोहित नवले यांनी माळरानावर फुलविली ड्रॕगन फ्रुटची फळबाग : दोन एकरात २० लाखाचे उत्पन्न
प्रतिनिधी : दिगंबर बोडखे
आष्टी : दि. २५ ऑगस्ट २०२६, शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग केले तर यशस्वी शेती करता येते. हे आष्टी तालुक्यातील खाकळवाडी येथील पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या रोहित दीपक नवले या तरुणाने दाखवून दिले आहे. माळरानावरील खडकाळ जमिनीत त्यांनी ड्रॅगन फ्रुटची बाग फुलवली आहे.आष्टी तालुक्याला पाणी टंचाईचे संकट तसे नवीन नाही.कधी पाण्याचा सुकाळ तर कधी दुष्काळ. त्यामुळे शेतीत नेहमीच परवडेल अशी स्थिती नसते त्यामुळे शेतीत वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केले तरच शेती उत्पादन भरवशाचे ठरते आष्टी तालुक्यातील खाकळवाडी येथे रोहित नवले यांची शेती आहे.यातील काही जमीन चांगली तर काही हलकी अशा स्वरूपाची. या हलक्या माळरानावरील खडकाळ जमिनीत कोणते पीक घ्यावे? हा त्यांना प्रश्न पडायचा. नवले पदवीधर आहेत पदवीधर आहेत त्यांनी बारामती येथे शिक्षण घेतल्याने त्यांना कृषी क्षेत्राची आवड आहे. रोहित नवले यांना ड्रॅगनफ्रुट बदल माहिती समजली.

त्याविषयी अधिक माहिती घेत त्यांनी विविध ठिकाणच्या ड्रॅगन फ्रुट बागांना भेटी दिल्या.रोहित नवले यांच्याकडे तीन एकर लिंबू आहे दोन एकर ड्रॅगन फूड आहे ड्रॅगन फूडची बाग हे तीन वर्षापासून आहे गतवर्षी दहा टन उत्पादन घेऊन आठ लाख रुपये नफा मिळवला होता तर यावर्षी १२ टन उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि दोन एकरामध्ये १० लाख रुपये नफा होईल असे रोहित नवले यांनी यावेळी सांगितले.
रोहितला समर्थपणे त्याची पत्नी सौ. गौरी मदत करत आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानसाठी पिताश्री दिलीप नवले, आई सौ. संगीता नवले आजोबा शंकर नवले यांची साथ आहे.२०२३ मध्ये त्यांनी त्यांच्या २ एकर शेतात ड्रॅगन फ्रुट फळबागेची लागवड केली. दोन वर्षांपासून त्यांना त्यातून उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली आहे. ड्रॅगन फ्रुट विविध आजारावर उपयुक्त फळ म्हणून खाल्ले जाते.वर्षात साधारण जुलै ते नोव्हेंबर हा या फळांचा हंगाम असतो. कमी देखभालीचे आणि कमी पाण्यात येणारे हे फळ असल्याने त्याला पाणी कमी, मनुष्यबळही तसे कमीच लागते.त्यामुळेच आपण या फळाची निवड केल्याचे नवले यांनी सांगितले.तोडणी झालेली ही फळे अहिल्यानगर, पुणे,नाशिक येथील व्यापाऱ्यांना विकले जाते.आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळावे असे आवाहन रोहित नवले यांनी केले आहे.








