टमाट्याला कवडीमोल बाजारभावाने शेतकरी त्रस्त.
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : दि. २५ ऑगस्ट २०२६, येवला तालुक्यातील राजापूर येथील प्रगतीशील शेतकरी बाबासाहेब मुरलीधर पालवे व भैरवनाथ वस्ती जवळ भिका विंचू यांनी वयेवला नांदगाव रस्त्या लगत राजापूर गावाच्या पुढे दोन एकर टोमॅटो लागवड केलेली असून सध्या ती उत्पन्न सुरू झाली असून व बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हातबल झाले आहे आतापर्यंत टमाट्यासाठी पाच लाख रुपये खर्च झालेला आहे व बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मालाला योग्य असा बाजारभाव मिळाला पाहिजे यासाठी शासनाने उपयोजना करणे गरजेचे आहे सध्या टोमॅटो बाजारात फक्त शंभर ते दीडशे रुपये कॅरेट जात असल्याने व शेतकऱ्याला एका कॅरेट साठी तोडणीव मार्केटला नेण्यापर्यंत साठ रुपये खर्च येत आहे.
येत आहे पण बाजार भाव 100 मिळत आहे. शेतकरी मेटाकुटीस ला आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने इतर पिकही चांगले नसून पीक येता की नाही ही शाश्वती नसल्याने शेतकरी वर्ग भरडला जात आहे येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये निसर्गाच्या पाण्यावर शेतकऱ्यांचे सर्व शेतीचे गणित अवलंबून असून येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही निसर्गावरच येथील शेती उपलब्ध आहे बाबासाहेब पालवे यांनी 25 मे रोजी शेततळ्याच्या पाण्यावर टमाटा लागवड केली व ती आज रोजी उत्पन्न निघायला लागली असून व त्यात बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
केलेला खर्च सुद्धा फिटणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मजुरी दर पाहता एका कॅरेट तोडणीसाठी पंचवीस रुपये कॅरेट असून मार्केटला नेण्याचे गाडी भाडे 30 रुपये असा 55 रुपये खर्च जागेवर येत आहेत व बाजारभाव कॅरेट 100 रुपये जात आहे.
तार व टोकर साठी दोन लाख बियाणे मलचिग पेपर मशागती खते ओषधे दोन लाख रुपयेइतर एकलाख रुपये असे पाच लाख रुपये खर्च झालेला आहे मात्र बाजार भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहेत. अशोक भिका विंचू शेतकरी राजापूर.








