कार गाडीला मोटरसायकल घासली नुकसान भरपाई मागितली या कारणा वरून ६ इसमांनी मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
प्रतिनिधी : अनिल गायकवाड
दौंड : दि. २६ ऑगस्ट २०२६, शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटल या ठिकाणी यश नवनाथ गायकवाड यांच्या कार गाडीला. कृष्णा भूपेंद्र भूल. सध्या रा.गोपाळवाडी ता.दौंड जि.पुणे यांने त्याच्या ताब्यातील मोटर सायकलने कार गाडीला धडक देऊन घासला. म्हणुन यश नवनाथ गायकवाड याने नुकसान भरपाई मागितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. ५ ते ६ इसमांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने हॉकी स्टीक रॉड, कोयता यांने मारहाण केली. हि घटना दिंनाक-२४/ ०८/२०२६ रोजी दुपारी ४:३० वाजे सुमारास मौजे महालक्ष्मी हॉस्पिटल दौंड ता. दौंड. जि. पुणे या ठिकाणी घडली असून दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यश नवनाथ गायकवाड वय.२० वर्ष व्यवसाय शिक्षण रा. कासुर्डी, ता. दौंड जि. पुणे याचे फिर्यादी वरून गुन्हा र.नं ६२२/२०२६ भा.न्या.संहिता कलम.१०९.(१)११८.(१) ३५२. ११५.(२).१८९.(२)१८९.(४)१९०.१९१.(२)१९१(३) नुसार आरोपी नाव व पत्ता १) अशपाक अन्सार सय्यद रा. बालाजी नगर दौंड ता. दौंड जि. पुणे २) कृष्णा भूपेंद्र भूल सध्या रा. गोपाळवाडी ता.दौंड जि.पुणे मूळ रा अच्छाम नेपाळ ३) अमोल ज्ञानेश्वर मुळे रा. शिवाजीनगर खवठे हॉस्पिटल मागे दौंड ता.दौंड जि. पुणे ४) झहीर नजीर सय्यद रा.बिलावल गार्डन ता.दौंड जि. पुणे ५) सज्जस शौकत सय्यद रा. बिलावल गार्डन पर्ल पार्क अपार्टमेंट बी विंग फ्लॅट नंबर २०३ दौंड ता दौंड जि. पुणे ६) तबरेज शौकत सय्यद रा. बिलावल गार्डन पर्ल पार्क अपार्टमेंट बी विंग फ्लॅट नंबर २०३ दौंड ता दौंड जि. पुणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हकीकत दि.२४/०८/२०२६ रोजी दुपारी ४:३० वाजे सुमारास मौजे महालक्ष्मी हॉस्पीटल दौड ता.दौड जि.पुणे गावच्या हद्दीत फिर्यादीच्या ताब्यातील कारला आरोपी नंबर २ यांने त्याच्या ताब्यातील मोटर सायकलने घासला म्हणुन फिर्यादी मजकुर यांने नुकसान भरपाई मागितली या कारणावरून आरोपी नंबर ४ यांने त्याच्या हातामध्ये कोयता आरोपी नंबर ५ यांच्या हातामध्ये रॉड आरोपी नंबर ६ याच्या कबंरेला पिस्तुल आरोपी नंबर १ व इतर ४ ते ५ इसम त्यांच्या हातामध्ये हॉकी स्टीक घेवुन आले व त्यांनी फिर्यादी व फिर्यादीची आई आजी फिर्यादीचा मावस भाऊ मंथन व स्वानंद यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हॉकी स्टीक रॉड, कोयता यांने मारहाण केली त्यामध्ये मंथन व स्वानंद गंभीर जखमी झाले वगैरे मजकुरा वरून दाखल असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी १ ते ०६ यांना दि २५/०८/२०२६ रोजी रात्री ०१:५३ वाजता अटक केली असल्याची माहिती दौंड पोलीसांनी दिली असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी हे करीत आहेत.








