यवत पोलीसांची कामगिरी कृषीपंपाच्या तांब्याचे केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : अनिल गायकवाड
दौंड : दि. २६ ऑगस्ट २०२६, तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नाथाचीवाडी ता. दौंड जि. पुणे गावचे हद्दीतील माटोबा तलाव येथुन एकुण २० शेतकऱ्याच्या शेती पाण्याच्या मोटर पंपासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याचे केबल चोरी गेल्याने. यवत पोलीस ठाणे येथे एकुण ०३ गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरिता तात्काळ तपास पथक तयार करून अज्ञात आरोपीचा सी.सी. टी.व्ही. फुटेज व गोपनीय बातमीदारा मार्फत शोध घेतला असता.
सदर केबल चोरीतील आरोपी मनोज गुलाब बिंद, वय-३७ वर्षे, व्यवसाय मजुरी सध्या रा. तानाजी शेवाळे यांचे भाडयाचे खोली नं. ०१ मध्ये मांजरी फार्म, ता. हवेली जि. पुणे मुळ रा. बरेनी बारीपुर, ता. कच्छुआ जि. मिर्झापुर राज्य उत्तरप्रदेश याने केल्या असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याने आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता. आरोपीने दिनांक ०८/०८/२०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजे ते दि.०९/०८/२०२६ रोजी सकाळी ०८.०० वाजे दरम्यान मौजे नाथाचीवाडी ता. दौंड जि. पुणे गावचे हद्दीत माटोबा तलाव येथुन एकुण २० शेतकऱ्याच्या शेती पाण्याच्या मोटर पंपासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याची केबल चोरी केली असल्याची कबुली दिली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली असून सदर आरोपीस अटक करून गुन्हयाचे तपासादरम्यान अटक आरोपीकडुन एकुण १ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल व गुन्हा करते वेळी वापरलेली मोटार सायकल असा एकुण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल ०३ गुन्हयातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोहवा संदिप देवकर, पोहवा रॉकी देवकाते, पोहवा महेंद्र चांदणे, पो.कॉ.धिरज जाधव, पो.कॉ. मारूती बाराते, पो.कॉ. प्रतिक जगताप, पो.कॉ.अमोल भुजबळ, पो.कॉ.सचिन गुंड, पो.कॉ. दिनेश लोणकर व पो.कॉ. विनित कुऱ्हाडे यांनी केलेली आहे.








