यावल शहराच्या विकासासाठी ₹७ कोटींच्या अल्पसंख्याक निधीची मागणी
प्रतिनिधी : बशीर तडवी
जळगाव (यावल) : दि. २६ ऑगस्ट २०२६, शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी ₹७ कोटींचा विशेष विकास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शहरातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.
आमदार अमोलदादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभा शिंदे आणि जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे यांच्या सहकार्याने नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. यावेळी यावल शहरातील अल्पसंख्याकबहुल भागांच्या विकासासाठी ₹७ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कदीर खान, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उमेशदादा फेगडे, विद्यमान नगरसेवक हेमराजदादा फेगडे उर्फ बाळूदादा तसेच भाजपाच्या गटनेत्या नंदाताई महाजन यांचे चिरंजीव उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, यावल शहरातील अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
प्रस्तावित निधीतून अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये विविध पायाभूत सुविधा व विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यावल शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.








