भिसी न. प. च्या काँग्रेस गट नेते पदी महेश रामटेके यांची निवड
प्रतिनिधी: समीर बल्की
तालुक्यातील नगर पंचायत भिसी च्या काँग्रेस गट नेते पदी महेश रामटेके यांची तीन विरूद्ध दोन मताने निवड दि २४ ऑगस्ट २०२६ ला जिल्हाधिकारी (नगर पंचायत प्रशासन) वसुमना पंत यांच्या आदेशाप्रमाणे झालेली आहे. त्यामुळे मिना मुंगले यांना गटनेते पदावरून पायउतार व्हावे लागले.
भिसी नगर पंचायत च्या सार्वत्रिक निवडणुमध्ये काँग्रेस चे एकुण ७ नगरसेवक निवडूण आलेले होते तेव्हा दिनांक २४ डिसेंबर २०२५ ला सर्वानुमते मिना मुंगले यांची नगर पंचायत भिसी येथे काँग्रेस च्या गटनेते पदी निवड करण्यात आलेली होती मात्र १७जुलै २०२६ रोजी मिना मुंगले यांना गट नेते पदावरून पायउतार करून महेश रामटेके यांची काँग्रेस च्या गटनेते पदी निवड करण्यात यावी म्हणून ज्योती मुंगले, महेश रामटेके, मंजू रामटेके, वैशाली दिघोरे व सुनिल तांबे या पाच नगर सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय (नगर पंचायत प्रशासन) चंद्रपूर येथे
स्वाक्षरी करून निवेदन सादर केले होते. त्यामुळे २८ जुलै व ११ ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे प्रत्यक्ष सुनावणी होऊन दोन्ही पक्षाकडुन युक्तीवाद करण्यात आलेले होते. त्यानंतर वैशाली दिघोरे व सुनिल तांबे या दोन नगर सेवकांनी मिना मुंगले यांचे बाजुने असल्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल केले. वैशाली दिघोरे व सुनिल तांबे यांनी दोन्ही बाजुने प्रतिज्ञापत्र सादर केल्याने यांचे मत परस्पर विरोधी असल्याने बाद करण्यात आले एकुण ७ पैकी ५ नगर सेवकांचे मत असल्याने महेश रामटेके यांचे बाजुने महेश रामटेके, ज्योती मुंगले व मंजू रामटेके असे तीन नगर सेवकांचे मत ग्राह्य धरण्यात आले तर मिना मुंगले यांचे बाजुने दोन नगरसेवक असल्याने महेश रामटेके यांची भिसी नगर पंचायत येथे काँग्रेस चे गटनेते पदी निवड झाल्याचा आदेश चंद्रपूर च्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिलेला आहे.








