लेंडी पुनर्वसन हसनाळ अंतर्गत प्रलंबित मागण्यासाठी आढावा बैठक संपन्न
निर्धारित वेळेत सर्वविभाग समन्वयाने काम करून धरणग्रस्तांचे मागण्या तात्काळ सोडवा -उपजिल्हाधिकारी अनुप पाटील
प्रतिनिधी : संघपाल मदने
देगलूर : जिल्ह्यातील महत्वकांक्षी आंतरराज्य लेंडी प्रधान प्रकल्प अंतर्गत प्रलंबित पुनर्वसन ठिकाणच्या कामे निर्धारित वेळेत करा अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा अधिकारी अनुप पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बैठक हॉल येथे सोमवारी अकरा वाजता पार पडलेल्या बैठकीमध्ये लेंडी प्रकल्पांतर्गत पुनर्वसन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुलांतर्गत येणारे सर्व विषय जलसंपदा विभाग, सर्वांचे अंतिम टप्प्यातील काम , मूलभूत पायाभूत सुविधा, मुख्य रस्ता , विज, पाणी, पक्के घर, हसनाळ खानापूर पुनर्वसन येथील दोन दशकापासून प्रलंबित मागण्या सोडवण्यासंदर्भात बाबत आढावा घेण्यात आला. सर्व पुनर्वसन ठिकाणच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला.
त्यामध्ये हसनाळ पमु पुनर्वसन रखडलेल्या कामाबाबत तात्काळ विषया अंतर्गत येणाऱ्या कामाला गती देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली यावेळी सर्व विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे (नांदेड)प्रमुख श्री नाईक मुखेडचे तहसीलदार श्री लाड , गटविकास अधिकारी शिवाजीराव ढवळे, पुनर्वसन अधिकारी, मंडळ अधिकारी ईश्वर कुमार मडगिलवार, तलाठी धनाजी देशमुख, विविध विभागाचे अधिकारी यांना तात्काळ कारवाई करून धरणग्रस्तांचे प्रलंबित पुनर्वसनाबाबत चे प्रश्न सोडवण्याचे आदेश यावेळी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी देण्यात आले,
सर्वप्रथम वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय लढ्यासाठी, प्रलंबित मागण्यासाठी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून अग्रेसर असणाऱ्या धरणग्रस्त हसनाळकरांना तसेच सर्व जल आक्रोश आंदोलन शिष्टमंडळ यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हसनाळ पमु पुनर्वसन येथील प्रलंबित कामे सर्व विभागस्तरावर समन्वय राखून सोडवण्याबाबत आश्वासित केले. यावेळी दैनिक लोकप्रश्नचे पत्रकार दिलीप मादाळे यांनी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांना प्रलंबित धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता ती कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करून ही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती दिली.








