भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सलीम बागवान यांची सलग तिसऱ्यांदा निवड
जामखेड, अहिल्यानगर : भारतीय जनता पार्टीचे गेल्या १५ वर्षांपासून निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते सलीम बागवान यांच्या संघटनात्मक कार्याची व पक्षासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड करण्यात आली आहे.
सलीम बागवान यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात भाजपा अहिल्यानगर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदापासून केली. अल्पसंख्याक समाजाला भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी जोडण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.
त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय यांच्या वतीने त्यांची अहिल्यानगर अल्पसंख्याक कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षाने त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची दखल घेत ‘सोफी संवाद महाअभियान’चे महाराष्ट्र प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली.
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र भाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपा आयोजित ‘सौगात-ए-मोदी’ या विशेष अभियानाचीही महाराष्ट्राची प्रमुख जबाबदारी सलीम बागवान यांनी यशस्वीपणे सांभाळली.
तसेच महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे संचालक म्हणून सलग तीन वर्षे महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सेवेसाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. हज यात्रेकरूंच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.
पक्षाशी असलेली निष्ठा, संघटन वाढविण्यासाठी केलेले अथक परिश्रम, अल्पसंख्याक समाजाशी सातत्याने साधलेला संवाद आणि सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांची अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याचे मानले जात आहे.
या निवडीबद्दल सलीम बागवान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. रामजी शिंदे साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. इद्रिस मुलतानीजी तसेच भाजपा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री. दिलीपजी भालसिंग साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
“पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी केवळ पदाची जबाबदारी नसून, अल्पसंख्याक समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटन मजबूत करण्यासाठी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी यापुढेही पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन,” असा विश्वास सलीम बागवान यांनी व्यक्त केला.








