राहाता – शिर्डी वर्धापनदिन विशेष…
प्रतिनिधी : रोहित जोशी
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर हे केवळ एक गाव नसून उत्तर महाराष्ट्राच्या व्यापारी, कृषी आणि धार्मिक नकाशावर महत्त्वाचे स्थान असलेले जुळे गाव आहे. प्रवरा नदीच्या समृद्ध खोऱ्यात वसलेल्या या गावाला पौराणिक, ऐतिहासिक परंपरा, प्रसिद्ध प्रसिद्ध आठ आठवडे बाजार, शेतीमालाची मोठी उलाढाल आणि साडेतीन शक्तीपीठ यांचे एकत्रित वस्तीस्थान असलेले भगवती माता मंदिराचे धार्मिक महत्त्व लाभले आहे. त्यामुळे कोल्हार भगवतीपूरच्या नावाजलेल्या बाजारपेठेला काळानुरूप बदल करीत आणखी आधुनिक सुविधांनी सुसज्ज करून तिचा नियोजनबद्ध विकास करण्याची गरज अधिक प्रकर्षाने पुढे येत आहे. नाशिक, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, अहिल्यानगर यांसारख्या प्रमुख शहरांशी कोल्हार भगवतीपूरचा असलेला संपर्क, परिसरातील बागायती शेती, वाढती लोकसंख्या आणि सातत्याने वाढणारी व्यापारी उलाढाल लक्षात घेता भविष्यात ही बाजारपेठ केवळ स्थानिक बाजारपेठ न राहता एक मोठे प्रादेशिक व्यापारी केंद्र बनू शकते.
मात्र त्यासाठी पारंपरिक बाजारपेठेच्या चौकटीतून बाहेर पडून आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
मार्केटला कोल्हार भगवतीपूर ब्रँड बनविण्याची गरज कृषी, व्यापार, धार्मिक पर्यटन आणि आधुनिक सुविधांची सांगड घातल्यास कोल्हार भगवतीपूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा कोल्हार भगवतीपूर ब्रेड विकसित करण्याची संधी कोल्हार भगवतीपूर परिसरातील कृषी उत्पादनांना स्वतंत्र ओळख निर्माण करून कोल्हार भगवतीपूर ब्रेड विकसित करण्याची संधी आहे. स्थानिक फळे, भाजीपाला, कृषी प्रक्रिया उत्पादने, घरगुती खाद्यपदार्थ आणि पारंपरिक वस्तूना पॅकिंग व ब्रडिंग करून मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येऊ शकते. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
आजचा डिजिटल बाजारपेठेची निर्मिती व्यापार मोठ्या प्रमाणावर डिजिटल होत आहे. त्यामुळे कोल्हारच्या बाजारपेठेलाही डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे. ई-नामसारख्या राष्ट्रीय कृषी बाजार व्यवस्थेशी जोडणी, डिजिटल वजनकाटे, यूपीआय पेमेंट, ऑनलाइन बाजारभाव, डिजिटल पावत्या आणि इलेक्ट्रॉनिक व्यवहार यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक होऊ शकतात. बाजारातील प्रमुख ठिकाणी मोठे एलईडी डिजिटल फलक बसवून विविध शेतीमालाचे दर, बाजारातील सूचना, शासकीय योजना आणि कृषीविषयक माहिती नागरिकांना उपलब्ध करून देता येईल.
आठवडे बाजार ही आर्थिक ओळख कोल्हार भगवतीपूरचा शुक्रवारचा आठवडे बाजार ही या परिसराची अनेक वर्षांपासूनची आर्थिक ओळख आहे. परिसरातील शेतकरी, व्यापारी, छोटे व्यावसायिक, हातगाडीधारक, फळ-भाजी विक्रेते, पशुपालक आणि ग्राहक यांची मोठी आर्थिक साखळी या बाजाराशी जोडलेली आहे. परिसरातील शेतकरी भाजीपाला, फळे, डाळिंब, पेरू, ऊस तसेच विविध कृषी उत्पादने विक्रीसाठी आणतात. मात्र वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील गरजा लक्षात घेऊन बाजारपेठेचे पुनर्रचना आणि आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे.
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय – शुक्रवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी तसेच सणावारांना आणि सुट्टयांच्या दिवशी कोल्हार भगवतीपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि वाहनांची गर्दी होते. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. या समस्येवर तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी नियोजन करणे आवश्यक आहे. बाजारपेठेपासून काही अंतरावर मोठी वाहनतळ व्यवस्था, मालवाहू वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग, दुचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग आणि बाजाराच्या मुख्य भागात अनावश्यक वाहन प्रवेशावर नियंत्रण अशी उपाययोजना करता येईल. भविष्यातील वाढ़ लक्षात घेऊन पर्यायी मार्ग, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची गरज आहे.
प्राधान्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने सुरक्षा व्यवस्थाही सक्षम असणे आवश्यक आहे. संपूर्ण बाजार क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे, नियंत्रण कक्ष, सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्था आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्था उभारता येईल. आग लागणे, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण संजय दादासाहेब कोळसे कोल्हार भगवतीपूर सुरक्षा व्यवस्थेला झाल्यास तातडीने मदत मिळण्यासाठी अग्निसुरक्षा उपकरणे आणि आपत्कालीन मार्ग निश्चित करणे गरजेचे आहे.
बैंकिंग आणि आर्थिक सुविधा व्यापाराच्या वाढीसोबत बैंकिंग सुविधा वाढविणेही महत्त्वाचे आहे. बाजार परिसरात बैंक शाखा, एटीएम, डिजिटल बैंकिंग सुविधा आणि लघु उद्योजकांसाठी कर्ज मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देता येईल, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. धार्मिक पर्यटन आणि कृषी पर्यटनाची सांगड साडेतीन शक्तीपीठांचे दुर्लभ एकत्रित वस्तीस्थान असलेले श्री भगवतीमाता मंदिर आणि प्रभू रामचंद्रांच्या काळातील कोल्हाळेश्वर महादेव मंदिर हे कोल्हार भगवतीपूरचे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. दोन्ही मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. या धार्मिक पर्यटनाला स्थानिक कृषी आणि व्यापारी अर्थव्यवस्थेशी जोडल्यास कोल्हारच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. धार्मिक पर्यटन कृषी पर्यटन स्थानिक बाजारपेठ असा त्रिसूत्री विकास मॉडेल तयार करता येईल. स्थानिक शेतमाल, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, हस्तकला, महिला बचत गटांची उत्पादने आणि पारंपरिक खाद्यपदार्थासाठी विशेष विक्री केंद्रे उभारता येतील. यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना स्थानिक उत्पादनांची ओळख होईल आणि स्थानिक नागरिकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल.
भविष्यासाठी कोल्हार भगवतीपूर मार्केट मास्टर प्लॅन कोल्हार भगवतीपूर बाजारपेठेचा विकास तुकड्या-तुकडधाने करण्याऐवजी पुढील १५ ते २० वर्षांचा विचार करून कोल्हार भगवतीपूर मार्केट मास्टर प्लॅन तयार करण्याची आवश्यकता आहे.
या मास्टर प्लॅनमध्ये बाजारपेठेची हद्द, रस्ते, पार्किंग, व्यापारी संकुल, कृषी बाजार, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, सुरक्षा, पर्यटन आणि हरित क्षेत्र यांचा समावेश असावा, सार्वजनिक-खासगी सहभागातून विकास बाजारपेठेच्या विकासासाठी केवळ सरकारी निधीवर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी संघटना, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि खासगी उद्योग यांच्या सहभागातून विविध प्रकल्प राबवता येतील. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पार्किंग, कोल्ड स्टोरेज, व्यापारी संकुल, प्रक्रिया केंद्र आणि इतर सुविधा उभारण्याचा पर्यायही तपासता येईल. कोल्हार भगवतीपूरच्या विकासासाठी स्थानिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, महिला बचत गट, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. या आराखड्यासाठी शासनाच्या विविध योजना, जिल्हा नियोजन समितीचा निधी, कृषी विभागाच्या योजना आणि उपलब्ध इतर निधींचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. कृषी व्यापार, आधुनिक बाजारपेठ, डिजिटल तंत्रज्ञान, धार्मिक पर्यटन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक रोजगार या सर्वांची सांगड घातली तर कोल्हार भगवतीपूरचा आर्थिक चेहरामोहरा बदलू शकतो.
आज नियोजन केले तर उद्या कोल्हार भगवतीपूर केवळ प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून नव्हे तर महाराष्ट्राच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण करू शकते.








