मुंढे यांच्या निर्णयामुळे गायीला मिळाला विक्रमी भाव; शेतकऱ्याच्या कालवडीची १ लाख ७५ हजार रुपयांना विक्री
प्रतिनिधी : रोहित जोशी
राहाता तालुक्यातील साकूरी येथील शेतकरी रामदास शिंदे हे शेती व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून गेल्या काही काळापासून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या गोठ्यात सुमारे ५ ते २० गायी असून, उत्तम संगोपन, योग्य आहार आणि पशुवैद्यकीय मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी दुग्ध व्यवसायाला चांगली दिशा दिली आहे. त्यांच्या गोठ्यातील एका कालवडीची नुकतीच तब्बल १ लाख ७५ हजार रुपये या विक्रमी किमतीत विक्री झाली असून, यामुळे परिसरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे यांच्या गोठ्यातील ही कालवड घरच्या होल्स्टीन जातीच्या गायीपासून जन्मलेली असून, तिची पैदास बायोफच्या ‘आकाशदीप’ वळूच्या सिमेनपासून करण्यात आली आहे. कालवडीची जन्मापासूनच विशेष काळजी घेण्यात आली.
तिच्या आरोग्याकडे सातत्याने लक्ष देत योग्य आहार, स्वच्छता आणि वेळोवेळी पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. या कालवडीला पहिल्या १०० दिवसांपर्यंत दररोज सकाळ-संध्याकाळ मिळून सुमारे ६ ते ७ लिटर दूध देण्यात आले. योग्य संगोपनामुळे तिची वाढ निरोगी व सुदृढ दूध व्यवसायाला चांगले दिवस दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रात प्रशासकीय पातळीवर घेतलेल्या निर्णयांचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होत असल्याचे शेतकरी रामदास शिंदे यांनी सांगितले. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एफडीआयमध्ये कारभार स्वीकारल्यानंतर दूध व्यवसायाला चांगले दिवस आले असून, दूध व दुग्ध व्यवसायाशी संबंधित जनावरांना मिळणाऱ्या भावातही सकारात्मक बदल जाणवत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
झाली. सध्या ही कालवड नऊ महिन्यांची असून, तिची शारीरिक ठेवण, जातवैशिष्ट्ये आणि उत्तम संगोपन यामुळे तिला बाजारात चांगली मागणी निर्माण झाली. परिणामी शिंदे यांना तिचा अपेक्षेपेक्षा चांगला दर मिळाला.
त्यामुळे भाव जास्त मिळाल्याच्या आनंदात शेतकऱ्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. या कालवडीच्या संगोपनासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर प्रसाद असणे आणि डॉक्टर मयूर मुर्तडक यांचे वेळोवेळी वैद्यकीय मार्गदर्शन लाभले. कालवडीच्या आरोग्याची काळजी, लसीकरण, आहार व वाढीबाबत त्यांनी आवश्यक सल्ला दिला. त्यामुळे कालवडीची योग्य पद्धतीने वाढ होण्यास मदत झाली.








