रानटी हत्तींनी केली देवस्थान पाच पांडव मुर्त्यांची तोडफोड; शेतीची नुकसान, शेतकऱ्यांत भिती
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली : (आरमोरी) वैरागड आणि आजूबाजूच्या परिसरात कालच्या रात्री ला अंधारात रानटी हत्तींच्या कडपाने शेतकऱ्यांच्या शेतीची व या परिसरातील सुप्रसिद्ध देवस्थान पाच पांडवांच्या मुर्त्यांची धुमाकूळ घालत तोडफोड करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह परिसरातील गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सकाळी घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पोहचताच शेतकरी व नागरिक घटनास्थळी एकत्र येत आपापल्या शेतीची व देवस्थानाची नुकसानाची पाहणी केली.
वैरागड परिसरात रात्रीच्या सुमारास रानटी हत्तींचा कळप दाखल झाले. रानटी हत्तीच्या सततच्या वाढत्या धुमाकूळामुळे शेतकरी चिंतेत आहेत .शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. अशी बिकट शक्यता निर्माण होत असल्याने वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे यांच्याकडे शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने सूचना देऊन रानटी हत्तीच्या कडपाचा बंदोबस करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती केलेली आहे.
वनविभागाने शेतकऱ्यांच्या शेतीची झालेली नुकसान व देवस्थान पाच पांडवांच्या मुर्त्यांची तोडफोड झालेली नुकसानाची घटनास्थळाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी .रानटी हत्तीचा ठोस बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.अशी मागणी वैरागड परिसरातील नागरिक व शेतकऱ्याकडून होत आहे. रानटी हत्तीच्या वावरांमुळे वैरागड व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.








