चातगाव ला पेसा मोबीलायझर्सची महत्वपूर्ण बैठक संपन्न; आझाद समाज पार्टी संघर्षात नेहमीच सोबत राहणार
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली व धानोरा तालुक्यातील चातगाव येथे पेसा मोबीलायझर्सची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. नुकताच मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री यांनी पेसा मोबीलायझर्स यांना आपण आदिवासी विभागाकडून fund देऊन कायम ठेवण्याचे मान्य केले. त्या संदर्भात आज बैठक संपन्न झाली. पेसा मोबीलायझर्स च्या या लढ्यात आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष नासिर हाश्मी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, आझाद समाज पार्टी जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी उपस्थित होते. दोन्ही तालुक्यातील पेसा मोबीलायझर्स उपस्थित होते.








