शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना सहा विद्यार्थ्यांना कारने उडवले
प्रतिनिधी रोहित जोशी
शाळा श्रीरामपूर सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना भरधाव कारने धडक दिल्याने श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळशिरसगाव मार्गावर गुरुवारी हृदयद्रावक अपघात झाला. या दुर्घटनेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्राह्मणगाव वेताळ येथील सहा विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी विद्यार्थ्यांमध्ये वैभव अमोल बर्डे, प्रीती अमोल बर्डे, आकांक्षा आकाश बर्डे, केशव आकाश बर्डे, पूजा आकाश बर्डे आणि श्रद्धा बाळासाहेब तोरणे यांचा समावेश आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघातातीलसर्व विद्यार्थी आदिवासी व दलित समाजातील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माळेवाडी येथील हायस्कूलमधील एक शिक्षक स्विफ्ट डिझायर कारमधून शिरसगावच्या दिशेने जात असताना शाळेपासून काही अंतरावर हा अपघात झाला.
तीव्रतेने काही विद्यार्थी रस्त्यावर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी रस्त्याने घरी जात असतानाच भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. घटनेनंतर परिसरात एक गोंधळ उडाला. ग्रामस्थांन तत्काळ घटनास्थळी धाव घे जखमी विद्यार्थ्यांना मदत केली त्यांना श्रीरामपूर येथील साख कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजन असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर जखमींना पुढील उपचारासा प्रवरा रुग्णालयात हलविण्या आले.शाळा परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या अपघातामुळे शाळा परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळांजवळ वेगमर्यादा लागू करणे, वाहतूक नियंत्रण व्यवस्था करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामस्थांची तत्पर मदत अपघाताची माहिती मिळताच मार्केट कमिटीचे माजी संचालक राधाकिसन आहेर, किरण वेताळ, अण्णा वेताळ आणि रामदास फुलवर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी रुग्णवाहिका व रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधला.








