भविष्यात भीषण टंचाईची शक्यता त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे काळाची गरज ;
पाणी बचतीसाठी नागरिकांनी आतापासूनच सजग होण्याचे आ. पिंपळे यांचे आवाहन
प्रतिनिधी : मिलिंद इंगळे
पावसाने मारलेली दांडी आणि यंदाच्या पावसाळ्यात पाण्याची कमतरता पाहून प्रश्न निर्माण झाले आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील अर्धवट धरणे , नदी, नाल्यांना पाणी नसल्याने सुका दुष्काळ पडण्याचे चिन्ह दिसत असून त्या निमित्ताने आमदार हरिषभाऊ पिंपळे यांनी पाण्याची बचत करण्यासाठी आव्हान केले आहे.
भविष्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, पाण्याचा न प्रत्येक थेंब अत्यंत मौल्यवान आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाणी बचतीला प्राधान्य देत पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आमदार हरिभाऊ पिंपळे 1 यांनी केले. वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, अनियमित – पाऊस आणि भूजल पातळीत होणारी घट यामुळे भविष्यात पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत केवळ शासनाच्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने पाणी संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असल्याचे आमदार पिंपळे यांनी सांगितले. घरगुती वापरातील पाण्याची नासाडी टाळणे, नळ सुरू ठेवून पाणी वाया जाऊ न देणे, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून त्याचे संवर्धन करणे, या उपाययोजनांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.
‘आज पाणी मुबलक आहे म्हणून त्याचा अमर्याद वापर करू नका. भविष्यातील पिढ्यांचा विचार करून आजपासूनच पाण्याची बचत करा,’ असा संदेश देत आमदार हरिभाऊ पिंपळे यांनी नागरिकांना पाणी संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. चळवळ पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून जीवनाचा आधार आहे. त्यामुळे पाणी बचत आणि जलसंवर्धनाची लोकसहभागातून उभी राहिल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.








