भारती विद्यापीठ पोलीसांकडुन तीन गावठी बनावटीचे कट्टे व चार जिवंत काडतुस जप्त, दोन गुन्हे दाखल करुन दोन आरोपींना अटक
प्रतिनिधी : कांताभाऊ राठोड
भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी सणोत्सवाच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदारांनी ३ गावठी बनावटीचे कट्टे व ४ जिवंत काडतुसे जप्त करुन, २ बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगल्याने गुन्हे दाखल करुन, २ आरोपी अटक करण्यात आले आहे.
सदर कामगिरीचा घटनाक्रम पुढील प्रमाणे. दिनांक २६/०८/२०२६ रोजी पोलीस उप निरीक्षक रवि जाधव, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना २३.५२ वा. चे सुमारास साई सिध्दी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यानच्या श्रीकोचींग क्लासेसच्या समोरील गल्लीमध्ये इसम नामे ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार, वय १८ वर्षे, (जन्म दिनांक २०/०८/२००८) रा. तापकीर चाळ, साई सिध्दी चौकाजवळ, शिवशंभो गल्ली क्रमांक २, आंबेगाव पठार, पुणे हा त्याचे ताब्यात १ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसांसहीत मिळुन आल्याने त्याचेकडुन ते जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४१/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २७/०८/२०२६ रोजी तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कात्रज डेअरी चौक ते सरहद् चौक दरम्यानचे कात्रज डेअरीचे भिंतीलगत एक इसम अग्नीशस्त्रासह थांबला आहे. त्याप्रमाणे नमुद ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेत असताना इसम नामे शिरीष जितेंद्र खोपडे, वय २६ वर्षे, रा. श्री गणेश निवास, जगदंब बिर्याणी समोर, सर्व्हे नंबर ३२/१० आंबेगाव पठार, पुणे हा त्याचे ताब्यात २ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसांसहीत मिळुन आल्याने त्याचेकडुन ते जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४४/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम
३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवि जाधव, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्लीकार्जुन कोळी, कृष्णा म्हस्के, यांच्या पथकाने केली आहे.








