पर्यावरणाची जाण ठेवून वृक्ष लावून केला वाढदिवस साजरा !
प्रतिनिधी : चंदन जंजाळ
बाळापूर : दिवसेंदिवस वातावरणामध्ये बद्दल होत चालला आहे त्याला कारण फक्त वृक्षाची कापनी सुरु असल्याने निर्सागा मध्ये बदल झाल्यामुळे हा प्रकार घडत आहे निसर्गाच्या अकृपेमुळे पाऊस बरसत नाही याची जान ठेऊन मोरगाव सादीजन येथील वृक्ष तसेच पर्यावरण मित्र सागर अनिल निखाडे यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, मोरगांव सादिजन व स्मशान भूमी येथे विविध प्रकारचे झाडे लावून उच्च श्रेणी मुख्याध्यापक सलामे , सरपंच वसंत सोळंके, ग्रामविकास अधिकारी वृषाली डोंगरे, व ग्राम पंचायत कर्मचारी सोपान सालफळे, योगेश सोंळके तंटामुक्ती अध्यक्ष उमेश र. निकाडे, बाळू निकाडे, युवराज पाटील,नागेश निकाडे,राहुल वाघ,वैभव निकाडे,विशाल उंबरकर,धीरज निकाडे, सम्यक निकाडे, कुलदीप निकाडे,आदित्य निकाडे,रणवीर तायडे,यश शै.निकाडे,चंद्रमणी निकाडे , विजय गव्हांदे,भूषण वाघ आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्ये उपस्थितीत राहून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक युवकाने अगाऊ चा खर्च न करता देशा करीता व समाजासाठी आपल्या वाढदिवसा निमित्त किमान एक वृक्ष तरी लावावे.








