येवला तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात जनता विद्यालय मुखेड तृतीय
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
येवला तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मुखेड येथील जनता विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. तर अखिल भारतीय विज्ञान मेळावा मध्ये आराध्या आहेर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
येवला तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा एन्झोकेम हायस्कूल मध्ये झाल्या, त्यात तालुक्यातील ९ शाळांनी भाग घेतला. या स्पर्धेत ‘मविप्र’च्या मुखेड येथील जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘इलेक्ट्रिक वाहने: पुढचा मार्ग’ या विषयावर नाटिका सादर केली. आराध्या आहेर, तनिष्का बडवर, हर्षाली शेळके, दिक्षा जुगृत, प्रसाद आव्हाड, रुद्र कुंभकर्ण, मयूर शेळके, ओम आहेर आदी विद्यार्थी सहभागी होते. नाटिकेचे लेखन ज्येष्ठ शिक्षक दिलीप खताळ यांनी केले तर वर्षा बडवर, सागर घोटेकर व श्याम शिंदे यांनी मार्गदर्शक केले.मविप्रचे येवला तालुका संचालक नंदकुमार बनकर,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विश्वासराव आहेर, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णराव गुंड , मुख्याध्यापक महेंद्र भगत, पर्यवेक्षक संजय गोसावी, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.








