राजापूर येथील भैरवनाथवाडी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे राजापूर
येवला तालुक्यातील राजापूर येथील भैरवनाथ वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. श्रावण महिन्यातील नागपंचमी पासून सुरू झालेला सप्ताह दिनांक 25 ऑगस्ट रोजी ह भ प बालाजी महाराज मोहिते यांच्या काल्याचे किर्तन होऊन आणि सप्ताहाची सांगता झाली आठ दिवस काकडा भजन प्रवचन कीर्तन दररोज महाप्रसाद असे आयोजन सप्ताह कमिटी व राजापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे दिनांक २३ रोजी सध्याकाळी असलेली पगत सोन्याबापु वाघ व अशोक महादू वाघ यांनी आलेल्या सर्वांना कुळदापासून बनवलेली जिलेबी व बाजरीची भाकर असा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने सप्ताह मध्ये हे एक आगळे वेगळे आकर्षण ठरले या सप्ताह साठी कुणाल दराडेफाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुणाल दराडे माजी आमदार नरेंद्र दराडेयांचीही उपस्थिती होती. दहीहंडी फोडून काल्याचे किर्तन होऊन आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप होऊन सप्ताहाची सांगता झाली या सप्ताहाकाळात भैरवनाथवाडी मित्र मंडळ व राजापूर ग्रामस्थांनी विशेष असे परिश्रम घेतले व सप्ताहाची सांगता झाली. आठ दिवस सप्ताकाळात सकाळ व संध्याकाळची पंगत देणाऱ्यांचा सत्कार भैरवनाथ वाडी सप्ताह कमिटीच्या वतीने कमिटीच्या वतीने करण्यात आला. व सप्ताहाची सांगता झाली








