देगलूर येथील आधार चालू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने बोंबमारो आंदोलन
प्रतिनिधी/संघपाल मदने
देगलूर येथील पोस्ट ऑफीस मधील आधार कार्ड नोंदणी केंद्र गेल्या ४ महीन्या पासून बंद असल्याने नागरिकांची हेळसांड होत असल्याने सदरील केंद्र त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील पोस्ट समोर शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी देगलूर तालुक्यातील एकमेव चालू असलेले आधार केंद्र मागील ४ महीन्या पासून बंद असल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोस्ट ऑफीस अधिकारी यांना घेराव घालून व नांदेडच्या मुख्य अधिक्षक पाठक, व उपमुख्य अधिक्षक कुलकर्णी यांना निवेदन देऊन आधार केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अन्यथा पोस्ट ऑफीस समोर निदर्शने धरणे बोंबमारो आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते तरीपण अद्याप पर्यंत आधार केंद्र चालू न झाल्याने दि.२८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पोस्ट ऑफीस समोर निदर्शने व बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन करण्यात आले यावेळी आधार केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अशा घोषणा देण्यात आल्या.
शैक्षणिक व इतर शासकीय कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याने आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी स्त्री, पुरुष, वृद्ध लहान बालके, सकाळी पाच वाजेपासून सर्व कामधंदा सोडून भुकताण विसरून लाईन मध्ये उभे रहावे लागत होते पण तेही एकमेव आधार केंद्र मागील चार महिन्यांपासून बंद असल्याने शैक्षणिक व शासकीय कामांसाठी आधार नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे बंद असलेले एकमेव आधार कार्ड नोंदणी केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अशी मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोस्ट ऑफीस समोर तीव्र बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर मुखेडचे तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर, मष्णाजी पैलावार, विनोद सोनकांबळे, अशोक कांबळे, मानाजी लोणे, लोणीकर, गंगाधर पाटील चाकूरकर, राजु उल्लेवार,हाणमंत राजुरे लख्खेकर, संजय पाटील मंगरुळे लख्खेकर,अशोक मारवाडे कावळगड्डेकर, शिवाजी पाटील, दत्ता राजुरे.शिवाजी चव्हाण, शंकरराव जाधव, अर्जुन लूटे, राजु जाधव आदींसह इतर पदाधिकारी व स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशिक्षण पोलिस निरीक्षक तथा पोलीस उपअधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी पोस्ट ऑफीसर पवार यांनी लवकरच आधार केंद्र चालू करण्याचे आश्वासन दिले.








