देगलूर येथे युवा सेनेच्या वतीने मोफत नेत्ररोग व दंत, नाक कान घसा तपासणी शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम
प्रतिनिधी/संघपाल मदने
येथे युवा सेनेच्या वतीने युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी दंतरोग व नाक कान घसा व चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला या शिबिरात २०० जणांनी सहभाग घेतला जवळपास १०० जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. गोर- गरीब दिन- दलित वृद्ध माता भगिनींनी, समजुन युवा सेना शहर प्रमुख विनोद लक्ष्मणराव सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यर्थ खर्च न करता श्री संत रविदास महाराज यांच्या सभागृहात युवा सेना युवा सेनेच्या वतीने व उपजिल्हाप्रमुख राहुल सोनकांबळे तडखेलकर मित्र मंडळीच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी, चष्मे वाटप,नाक,कान, घसा,व दंत चिकित्सा शिबीर संपन्न झाले.
या शिबिरात २०० जणांनी सहभाग घेतला होता तर जवळपास १०० जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले सदरील शिबिराचे उद्घाटन श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून करण्यात आले या शिबिरात अल्प वेळात नावलौकिक मिळविलेलेदेगलूर येथील सुप्रसिध्द मंतावार हाॅस्पिटलचे नेत्ररोग तज्ञ डॉ .सचिनमंतावार साहेब, डॉ. सौ.प्रियंका गुर्जर, व डॉ,. युवा नेते महेश पाटील गवंडगावकर यांचे छोटे बंधू दंतरोग तंत्र एकदंत हाॅस्पिटलचे डॉ मुकेश शिवाजीराव पाटील गवंडगावकर यांनी उपस्थितांना माता भगिनींचे व वृद्ध बांधवांचे मोफत तपासणी केली या प्रसंगी मोफत चष्मे वाटप करण्यात आले
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर शिवसेना शहर संघटक मष्णाजी पैलावार, युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल सोनकांबळे तडखेलकर, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे आदीसज्ञ राहुल सोनकांबळे मित्र मंडळाचे कार्यकर्ते, वृद्ध माता भगिनीं,बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते दरम्यान नेत्र , कान,घसा,दंत तपासणी करणे कसे गरजेचे आहे यांचे महत्त्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना केले.








