शासकीय वस्तीगृह, निवासी शाळा मधील विद्यार्थ्यांना आता टेट्रा पॅक दूध
प्रतिनिधी : एन .देशमुख
अमरावती. राज्यभरातील शासकीय वस्तीगृह आणि शासकीय निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना नियमित दूध पुरवठा करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समितीने अखेर पराग मिल्क फूड आणि श्री वरणा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड यांची निवड केली आहे. या दोन्ही पुरवठादारांना प्रत्येकी ५० टक्के दूध पुरवठ्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यास मंजुरी देण्यात आली असून समाज कल्याण आयुक्त पुणे यांना तात्काळ पुरवठा करण्याचे निर्देश ३१ ऑगस्ट रोजी शासन देशाद्वारे जारी करण्यात आले आहे.२००मि.ली. टेट्रा पॅक साठी २६.४० रुपये दर विद्यार्थ्यांना मिळणारे दूध दर्जेदार आणि सुरक्षित असावे यासाठी २००मि.ली.च्या टेट्रा पॅक मध्ये हा दूध पुरवठा केला जाणार आहे. खरेदी समितीने यासाठी प्रति ट्रॅक २६.४० रुपये असा दर निश्चित केला आहे.
विशेष म्हणजे हा मंजूर दर पुढील ३ वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहणार असून या ३ वर्षाच्या कालावधीसाठी पुरवठादारांना कोणत्याही प्रकारचे दरवाज दिली जाणार नाही अशी अट शासनाने घातली आहे असे सामाजिक न्याय विभागाचे आवरसचिव सतीश खैरमोडे यांनी स्पष्ट केले आहे.








