वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंबोली चौरस्ता येथे २५ नवयुवकांचा शिवसेनेत प्रवेश; संघटनेला मिळाली तरुणाईची ऊर्जा!
प्रतिनिधी : समीर बल्की
तरुणाईच्या जोशाला भगव्या विचारांची साथ मिळाली आणि चिमूरमध्ये शिवसेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाली! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील २५ नवयुवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या उपस्थितीत आणि तालुकाप्रमुख वैभव ठाकरे यांच्या नेतृत्वात या नवयुवकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. तरुणांच्या या उत्स्फूर्त प्रवेशामुळे चिमूर तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, आंबोली चौरस्ता येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर ताजने, उपजिल्हाप्रमुख अमित आखाडे, भद्रावती तालुकाप्रमुख नरेश काळे, नागभीड तालुकाप्रमुख भास्कर शिंदे, माजी विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे, माजी तालुकाप्रमुख सुधाकर निवटे यांच्यासह केवलसिंग जुनी, बंडू पिसे. राजेंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आगामी काळातील पक्ष संघटन, युवकांचा सहभाग आणि संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. २५ नवयुवकांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेच्या युवा संघटनेला नवे बळ मिळाले असून, आगामी काळात तरुणाईच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी केले, तर प्रास्ताविक तालुकाप्रमुख वैभव ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशांत नागपुरे. प्रफुल देशकर. मारोती मसराम. समीर बल्की. शुभम माळवे,उपसंरपच गणेश फुलबादे गट ग्राम पंचायत . चिकली रोहणा यांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








