यवत पोलीसांची कामगिरी मोटार सायकल चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.
(एक लाख दहा हजार रुपये किंमतीचा ०७ मोटार सायकल जप्त)
प्रतिनिधी : अनिल गायकवाड.
दौंड तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिनांक ०९/०७/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मौजे बोरीपार्धी ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत केडगाव रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या जागेत एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्पेंल्डर आय स्मार्ट मॉडेलची मोटार सायकल चोरीस गेली असल्या वरुन. यवत पोलीस ठाणे येथे गु.र.नं ६९९/२०२६ भा.न्या.सं ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तात्काळ तपास करण्यासाठी तपास पथक तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. सदर गुन्हयातील सी.सी.टी.व्ही.फुटेज व गोपनीय बातमीदारा मार्फत शोध घेतला असता सदर मोटर सायकल ची चोरी ही नामे बालाजी पांडुरंग लोखंडे राहणार मुरुड तालुका लातूर जिल्हा लातूर याने केली असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने पोलीसांनी चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्यास अटक करून गुन्हयाचे तपासादरम्यान अटक आरोपीकडुन यवत पोलीस स्टेशन गु.र.नं ६९९/२०२६ भा न्या सं ३०३(२) या गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल तसेच वेगवेगळया कंम्पनीच्या अशा एकुण ७ मोटार सायकल त्यांची एकुण किंमत अंदाजे.१ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरापीकडुन हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार. उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस. यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस हवालदार संदिप देवकर, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, पोलीस हवालदार अमोल काळे, पोलीस हवालदार महेंद्र चांदणे, पोलीस कॉ. धिरज जाधव, पोलीस कॉ. प्रतिक जगताप, पोलीस कॉ. अमोल भुजबळ, पोलीस .कॉ.सचिन गुंड, पोलीस कॉ.मारूती बाराते, पोलीस.कॉ. दिनेश लोणकर व पोलीस कॉ. विनित कुऱ्हाडे. यांनी केलेली आहे.








