आनंद तुपदाळे यांची मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६ साठी निवड!
प्रतिनिधी. अंबादास मुकटे
माहूर : समाज कार्यात आणि सार्वजनिक सेवेतील उत्कृष्ट योगदानाच्या सन्मानार्थ माहूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे तालुका अध्यक्ष आनंद गंगाधर तुपदाळे यांच्या योगदानाची दखल घेऊन, अत्यंत प्रतिष्ठित ‘मराठवाडा रत्न पुरस्कार . २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.
मिडिया पार्टनर.समाचार वाणी न्यूज तर्फे १२ सप्टेंबर २०२६ रोजी छ. संभाजीनगर येथे हा पुरस्कार सेलिब्रिटी प्रमुख पाहुण्या अभिनेत्री वर्षा उसगावकर . तसेच केंद्र व राज्य सरकार, बँकिंग, आरोग्यसेवा, मीडिया इत्यादी विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल. विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध चित्रपट अभिनेते किंवा अभिनेत्री आणि उद्योजकांच्या हस्ते पुरस्कार वितरण. (प्रमाणपत्र आणि ट्रॉफी) व प्रमुख सामाजिक व्यक्ती आणि उद्योजकांसोबत व्यावसायिक भेटी होणार आहे.
तुपदाळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.








