प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : येवला व नांदगाव तालुक्याच्या मध्यवर्ती डोंगराळी भागात राजापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परंतु येथे पुरेशी वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सेवक ही पदे रिक्त असल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सतरा गावांच्या रुग्णसेवेचा भार सांभाळा लागत आहे येथे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे येवला व नांदगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असून राजापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित केलेए आहे मात्र येथे अद्यापही पुरेशी कर्मचारी उपलब्ध नाही हे आरोग्य केंद्र ऑनलाईन दिसत नसल्याने येथे कर्मचारी येण्यासाठी उत्सुक नसतात कारण येथील कर्मचाऱ्यांचे पगार दुसऱ्या आरोग्य केंद्रामध्ये निघत असल्याने येथे कर्मचारी येण्यास टाळाटाळ करतात एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे या वैद्यकीय अधिकाऱ्यावर 24 तास सेवा देण्याची वेळ येत असल्याने त्यांच्यावर ताण वाढत आहे परिसरातील गावांमधील रुग्ण उपचारासाठी येतात मात्र बऱ्याच वेळा गोळ्या औषध उपलब्ध नसल्याने येथील कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे बऱ्याच वेळेला कुत्र्याची लस येथे उपलब्ध होत नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी डॉक्टर अभावी एका महिलेचा सर्प दंश मुळेमृत्यू झाला होता तरी आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्याची अद्याप नेमणूक केली नाही अधिकाऱ्यांनाही काही घेणे देणे दिसत नाही तातडीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.
राजापूर हे गाव डोंगराळ भागात आहे येवला नांदगाव पासून 20 किलोमीटर अंतरावर असल्याने रुग्णांना वेळेत उपचार होणे गरजेचे आहे एकच वैद्यकीय दोन-तीन महिन्यापासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळत आहे या अधिकाऱ्याला 24 तास सेवा करावी लागत असणे त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे त्यासाठी येथे अपुऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
ज्ञानेश्वर दराडे
जिल्हाध्यक्ष समता परिषद नाशिक तथा माजी सरपंच राजापूर








