सोयाबीन पिकातील चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावाची कृषी विभागाकडून पाहणी
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर तालुका कृषी अधिकारी श्री. एस. पी. पुजारी सर तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री. बी. सी. फरकाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुयारदंड परिसरातील सोयाबीन पिकामध्ये आढळून आलेल्या चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावाची कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी सोयाबीन पिकावर चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आला त्यावर कृषी विभागाकडून मार्गदर्शक सूचना व त्यावर उपाययोजना यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकरी श्री. गजानन राऊत व श्री. सचिन सुरस्कर, विजय सुरसकर, निकील राजुरकर,मगेश बल्की पोलीस पाटील पुयारदंड, अतुल गावडे,पाडुरंग फलके,शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ श्री. देशपांडे सर यांनी चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे, किडीची ओळख तसेच प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन पिकाची नियमित पाहणी करून प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला.
यावेळी तालुका तंत्र अधिकारी श्री. विलास शेंडे सर, उप कृषी अधिकारी श्री. जी. एन. बनसोडे सर, सहाय्यक कृषी अधिकारी कु. अदिती पिंपळकर तसेच परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते.








