अवैध बांधकामा बाबत उपविभागिय अधिकारी यांचे मार्फत विभागीय आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी : समीर बल्की
श्री गुरूदेव सेवा मंडळ चिमूर तालुका भु वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी (ता.ब्रम्हपुरी) वरील शासकीय निधीतून सुरू असलेल्या अवैध बांधकामा निषेधार्थ उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फत विभागीय आयुक्त नागपूर यांना निवेदन श्री गुरुदेव सेवा मंडळ, तालुका चिमूर यांचे नेतृत्वात देण्यात आले.
ब्रह्मपुरी चे तहसीलदार सतीश मासाळ यांच्या बेकायदेशीर मालकी हक्काबाबतच्या बेकायदेशीर अहवाला विरोधात व बेकायदेशीर बांधकाम करण्याचे वादग्रस्त अहवालाच्या निषेधार्थ चिमूर तालुक्यातील गुरुदेव भक्तांचे वतीने नागपूर विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
तुकाराम दादा गीताचार्य यांचे शेकडो अनुयायी आणि गुरुदेव भक्तांच्या स्वाक्षऱ्या सह निवेदनाद्वारे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सदरचे भक्त निवास बांधकाम आणि तहसीलदार चे मालकी अहवाल पत्र रद्द करण्यासंबंधी तात्काळ योग्य ती कारवाई न केल्यास विविध जिल्ह्यातील भाविक व गुरुदेव अनुयायांच्या वतीने तीव्र जाहीर जनांदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे.








