कुराडीच्या एका वारात भावानेच केला भावाचा खून…
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान मोठ्या भावाने दारूच्या नशेत लहान भावाच्या मानेवर कुऱ्हाडीचा जबरदस्त वार करून त्याचा जागीच खून केला असल्याची घटना घडली. हे दोघे भाऊ दारूच्या नशेमध्ये नेहमीच कोणत्याही कारणावरून नेहमीच भांडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृतकाचे नाव रमेश दिनकर वय 45 तर त्याचा खून करणारा मोठा भाऊ जगन दिनकर वय 48 हे दोघेही दारूच्या नशेमध्ये सायंकाळी सहा वाजता पासून भांडत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नेमके कारण काय याचा उलगडा अजूनही झालेला नसून डिस्टिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस चौकी येथील पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तर ये तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविला आहे अधिकचा तपास भिशी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगळे व पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार दुर्गेश नन्नावरे व सुनील घोडमारे आणि शंकरपूर पोलीस चौकीचे कर्मचारी करीत आहेत.








