चिमूर-नागभीड विधानसभा मित्र परिवारातर्फे महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर-नागभीड विधानसभा मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त मित्र परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व हितचिंतकांनी एकत्र येत महेंद्रभाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला. उपस्थितांनी महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या कार्याला पुढील काळातही बळ मिळावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शेकडोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








