गोर बंजारा तीज महोत्सवाला ऐतिहासिक स्वरूप:
देगलूर येथील कार्यक्रमात प्रथमच तीन मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी: संघपाल मदने
देगलूर – गोर बंजारा समाजाच्या अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानल्या जाणाऱ्या ‘तीज महोत्सवा’चे यंदा देगलूर येथे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या तीज महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच तीन मंत्री एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने, यंदाचा उत्सव ऐतिहासिक ठरणार आहे.
हा भव्य सोहळा रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी देगलूर येथील सेवालाल महाराज चौक येथे थाटामाटात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मा.ना.संजय भाऊ राठोड (कॅबिनेट मंत्री), मा. ना.इंद्रनील नाईक (राज्यमंत्री),मा ना सौ.मेघनाताई बोर्डीकर(राज्यमंत्री) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे गोर बंजारा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देगलूरसह संपूर्ण जिल्ह्यातून आणि परिसरातून हजारोच्या संख्येने बंजारा बांधव व भगिनी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक विशाल पवार यांनी दिली.
बंजारा समाजातील पारंपरिक वेशभूषा, तीजची गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी गोर बंजारा समाजातील सर्व बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजन व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या उत्सवाचे महोदयांना निमंत्रण देताना रामराव चव्हाण, बालाजी जाधव, सचिन जाधव, अनिल राठोड, गणेश पवार, संतोष पवार, संजय राठोड हे उपस्थित होते.








