कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
प्रतिनिधी : संदीप जाधव
टाकळीभान येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. दिनकर कुदळे, संचालक श्री. शंकरराव चव्हाण व संचालक श्री. सुनील मांजरे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना व्हाईस चेअरमन श्री. दिनकर कुदळे यांनी पुढील ऊस गळीत हंगामासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने टाकळीभान व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल, तसेच वेळेवर ऊस तोडणी करून ऊसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री. मंजाबापू थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन श्री. राहुल पटारे, माजी चेअरमन श्री. मधुकर कोकणे, संचालक श्री. विजय कोकणे, श्री. अविनाश लोखंडे, श्री. एकनाथ पटारे, श्री. देवदान रणनवरे, श्री. दिलीप पवार, श्री. शिवाजीराव धुमाळ, श्री. सुधीर मगर, श्री. भाऊसाहेब पवार, श्री. जयकर मगर, श्री. काकासाहेब कोकणे, श्री. अजित थोरात, श्री. दीपक डुकरे, श्री. बाळासाहेब शेळके, श्री. राजेंद्र देवळालकर, श्री. भैय्यासाहेब पठाण, श्री. रमेश कोकणे, श्री. सुरेश पटारे, श्री. सुरेश मुळे, श्री. अक्षय कोकणे, श्री. नंदू रणनवरे, घोगरगाव ग्रामस्थ श्री. राधाकिसन इंगळे, श्री. रविंद्र पटारे, श्री. संजय कदम, श्री. बंडोपंत बहिरट, सचिव श्री. रामनाथ ब्राम्हणे, श्री. रवी शिरसाठ, श्री. रघुनाथ शेळके, श्री. विठ्ठल बनकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवटी उपसरपंच श्री. कान्होबा खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले








