वरोऱ्यात शिवसेनेचा भगवा अधिक बुलंद!
असंख्य महिला व युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश; आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची ताकद वाढली!
प्रतिनिधी : समीर बल्की
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व विचारांवर विश्वास ठेवत, तसेच माजी खासदार व पक्षसचिव विनायक राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी वरोरा येथे शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम आणि जिल्हाप्रमुख भास्करभाऊ ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राहुल रांदिवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भव्य पक्षप्रवेशामुळे वरोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम झाली.
या वेळी असंख्य महिला व युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना आणि शिवसेनेच्या विविध अंगीकृत संघटनांच्या माध्यमातून पक्षसंघटना अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
निष्ठावंत शिवसैनिकांचे प्रशांतदादा कदम यांनी मानले आभार!
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम यांनी सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार मानले. पक्षासाठी आव्हानात्मक परिस्थिती असतानाही शिवसैनिकांनी शिवसेनेशी असलेली आपली निष्ठा कायम ठेवली, संकटाच्या काळातही पक्षाची साथ सोडली नाही आणि तळागाळात पक्षसंघटना वाढवण्यासाठी सातत्याने काम केले, याबद्दल त्यांनी सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचे विशेष कौतुक केले.
आगामी निवडणुकांसाठी विजयाचा निर्धार!
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम आणि जिल्हाप्रमुख भास्करभाऊ ताजणे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा पक्षप्रवेश वरोरा विधानसभा मतदारसंघाची आगामी राजकीय दिशा ठरवणारा असून, येणाऱ्या काळात संघटनेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश संपादन करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या वेळी शिवसेना, युवासेना, युवतीसेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यास विधानसभा प्रमुख दिलीपदादा कदम, वरोरा उपजिल्हाप्रमुख अमित निब्राड, चिमूर उपजिल्हाप्रमुख अमित आखाडे, वरोरा विधानसभा प्रमुख बंडू डाखरे, चिमूर विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर डूकरे, भद्रावती तालुकाप्रमुख नरेश काळे, ब्रह्मपुरी तालुकाप्रमुख नरेंद्र गाडगीळवार, नागभीड तालुकाप्रमुख भास्कर शिंदे, वरोरा तालुकाप्रमुख विपीन काकडे, वरोरा शहरप्रमुख अरुण नांदे, भद्रावती शहरप्रमुख बंटी हेमके, ब्रह्मपुरी शहरप्रमुख भूषण रामटेके, भद्रावती शहर संघटक बंडू चटपल्लीवार, शहर समन्वयक पुरुषोत्तम नाईताम यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच महिला आघाडी तालुका संघटिका विभा बेहरे आणि भद्रावती शहर संघटिका अर्चना गमे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीचा पक्षप्रवेश उत्साहात पार पडला.
कोंढा येथील मत्ते व घोरपडे तसेच मोडक यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील असंख्य नागरिकांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि नव्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होत असल्याचे यावेळी दिसून आले.
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच निर्धार!
यावेळी आशिष रांदिवे यांनी आपल्या भाषणातून आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत ठाम निर्धार व्यक्त केला. शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करत आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि जोमाने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
🟧 वरोऱ्यात भगवा मजबूत…
🟧 निष्ठावंत शिवसैनिकांची साथ…
🟧 युवक-महिलांची वाढती ताकद…
🟧 आगामी निवडणुकांसाठी विजयाचा निर्धार! 🚩
शिवसेना वाढतेय…
भगवा फडकतोय…
आणि आगामी लढाईसाठी वरोरा सज्ज होत आहे!
जय महाराष्ट्र! 🚩
जय शिवराय! 🚩








