देगलूर महाविद्यालयातील डॉ. खंदकुरे यांना एम आर पी मंजूर.
प्रतिनिधी : मनोज बिरादार
देगलूर :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील हिंदी विभागातील प्रा.डॉ. व्यंकट अमृतराव खंदकुरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडून “इक्कसवीं सदी की हिंदी कहानीयों पर्यावरण विमर्श”या विषयासाठी लघु शोध प्रकल्प (minor research project) मंजूर झाला आहे.
या यशाबदल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार, गंगाधरराव जोशी, रवींद्रअप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य डॉ एम एम चमकुडे उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक संग्राम पाटील , हिंदी विभागप्रमुख डॉ.संतोष येरावार , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.








