*हानेगाव व परिसरात हातभट्टीसह अवैध दारू व रसायन विक्री* पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/संघपाल मदने
देगलूर तालुक्यातील हानेगाव व परिसरात हातभट्टीसह अवैध दारू विक्री मोठ्या जोमाने होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे एकीकडे बोलवले जात असताना हानेगाव व परिसरात मात्र हातभट्टीसह देसी व विदेशी दारूची विक्री सर्रासपणे केली जात आहे अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापल्या जरी गेल्या तरी पोलीस प्रशासन मात्र या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे
या अशा अवैध धंद्यामुळे अनेक जणांचे संसार हे उघड्यावर येताना दिसत आहेत इतकेच नव्हे तर अनेक महिला ह्या संसाराला कंटाळल्या आहेत अशा अवैध धंद्यामुळे अनेक किशोर वईन मुलं या व्यसनाच्या आहारी जात आहे अशा अवैध दारू विक्रीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण ही वाढताना दिसत आहेत
या अशा मध्य पेइ मुळे लहान मुलांना त्याच बरोबर महिलांना या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे विशेषता युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेमुळे पालक वर्ग चिंतेत असून अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक संतुलन बिघडत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे
मध्य धुंद व्यक्तीच्या वावरांमुळे काही भागात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून गावातील शांतता व कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहेत गावामध्ये खुलेआम दारू व रसायन विक्री होत असताना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाना हे दिसत नाही का असे अनेक प्रश्न गावकरी उपस्थित करताना दिसत आहेत
अशा खुलेआम दारू व दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन विक्रेत्यांना कोणाचे पाठबळ मिळत आहे हे मात्र कळायला मार्ग मिळत नाही अशा अवैध दारू व अवैध रसायन विक्रेत्यांवर आता तरी संबंधित विभाग कारवाही करणार का असाही सवाल गावकरी विचारताना दिसत आहेत या दारू विक्रेत्यांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना वेळीच जर बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे संबंधित पोलीस प्रशासन या दारू विक्रेत्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.








