रामटेक, दि . ५ (प्रदीप कडबे):- भदंत सुरई ससाई यांचा वाढदिवस समता सैनिक दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम परमपूज्य तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून भंतेजी आगे बढो हम तुम्हारे साथ है क्या घोषणा देत भंतेजींना दीर्घ आयुष्य आणि निरोगीजीवन लाभो अशी मनोकामना व्यक्त करत केक कापून मोठ्या जयघोषात आणि उत्साहात समता सैनिक दलाचे लेझीम पथक समोर भव्य दिव्य रथात भंतेजी सुरई ससाई विराजमान होते, भव्य दिव्य बाईक रॅली काढून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले, त्यानंतर संपूर्ण रॅली आणि लेझीम पथक नागार्जुन येथील बुद्ध विहारात पोहोचले, शेवटी भीम गींताचा कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली यासाठी समता सैनिक दलाच्या संपूर्ण कार्यकर्ते वैशाली वाघमारे अनिसच्या सचिव शुभा थुलकर रमा राऊत ,तारा मेश्राम ,शीला सहारे, ज्योती धारगावे, कला मेश्राम अंजली गेडाम, भीमशाहीर / पत्रकार ,प्रदीप कडबे,आणि इतर सर्व सभासद गावकरी मंडळी उपासक आणि उपासिका , ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








