सर्वधर्म समभाव जातीय सलोखा राखत सावळीविहीर बु. येथे भक्तिमय वातावरणात श्री साई सतचरित्र पारायण सोहळा संपन्न..
पाच लाखाचा वैकुंठ रथ नानासाहेब कदम यांस कडून सावळी विहीर गावास अर्पण
प्रतिनिधी : राजेंद्र दुनबळे
शिर्डी – सावळीविहीर बु. येथे श्री साई सतचरित्र पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधला.
यावेळी ह. भ. प. पैठणकर महाराज यांचे आशीर्वाद घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सावळीविहीर गावासाठी
कै. तान्हुबाई विश्वनाथ कदम यांच्या स्मरणार्थ नानासाहेब कदम यांनी सावळीविहीर बु. ग्रामस्थांसाठी 5 लाख रुपये किमतीचा वैकुंठ रथ अर्पण केला. या वैकुंठ रथाचे लोकार्पण डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी नानासाहेब कदम यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांनी सत्कार केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव जपे अण्णा. यांच्या उपस्थितीत. सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे. सरपंच ओमेश जपे. उपसरपंच दत्तात्रय आगलावे. मा उपसरपंच विकास जपे. अशोकराव आगलावे. सोमनाथ आगलावे.रामदास आगलावे जिजाबा आगलावे. गणेश आगलावे शांताराम जपे .कैलास सदाफळ. स्वप्निल पारडे. संजय जपे सतीश जपे. यांनी डॉ सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला.
सावळीविहीर येथे जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली. साईनाथ महाराज की जय घोषाने परिसर दणाणला . सर्वधर्म समभाव जातीय सलोखा राखत श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे 23 वे वर्षे होते या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते 29/ 8/ 2026 ते 5/ 9/ 2026. या काळात ह भ प किरण महाराज हराळे ढोक नांदूर. स्वरूपानंद स्वामी महाराज पुणतांबा. समाधान महाराज पगार भाटगाव. आळंदी ऋषिकेश महाराज चव्हाण ठाणगावकर. गणेश महाराज तुपे सरला बेट .उत्तम महाराज गाडे पुणतांबा ढोक नांदूर. शाम महाराज ठोंबरे पुरणगाव. गोकुळाष्टमी. माधव महाराज पैठणकर. गोपाळकाला. आधी महाराजांची किर्तन व प्रवचन भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. सावळी विहीर येथील एकता तरुण मंडळ. अमरदीप युवक संघटना. परसराम महाराज मित्र मंडळ. जैन समाज. मुस्लिम समाज. सरपंच ओमेश जपे. सतीश जपे. विकास जपे मा. उपसरपंच यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना कीर्तनानंतर प्रसाद पंगत भोजनाची चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली. आलेल्या सर्व महाराजांच्या टाळ मृदंग चार्य भजनी मंडळ गायनाचार्य यांचा यथोचित सत्कार सावळीविहिर ग्रामस्थच्या वतीने करण्यात आला.
शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामस्थ, भाविक भक्त आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.








