कुरकुंभ येथे आमली पदार्थ गांजाचे सेवन करणाऱ्या एका इसमा विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे शेवाळे प्लॉट कुरकुंभ तालुका दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत बंद शाळेच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत इसम नामे किशोर अंबादास भागवत वय ३२ वर्ष रा कुरकुंभ ता दौंड जि पुणे हे खाली बसून चिलीम द्वारे गांजाचे सेवन करीत असताना दौंड पोलिसांना मिळून आला असल्याची माहिती दौंड पोलीसांनी दिली असून सदर इसमा विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अंकुश कृष्णा दळवी वय ३६ वर्ष पोलीस कॉ नेमणूक दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजि नं ६५५/२०२६ आमली पदार्थविरोधी कायदा १९५८ चे कलम ८ (क) २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई दि ०७/०९/२०२६ रोजी दुपारी २:३० वाजे दरम्यान करण्यात आली या कारवाई मध्ये मिळून आलेल्या आरोपीचे नाव किशोर अंबादास भागवत वय ३२ वर्ष राहणार कुरकुम तालुका दौंड जिल्हा पुणे असे आहे या बाबत अधिक माहिती अशी की.
हकिकत दि.०७/०९/२०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास मौजे शेवाळे प्लॉट कुरकुंभ तालुका दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत बंद इंग्लिश मीडियमचे स्कूलचे बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत इसम नामे किशोर अंबादास भागवत वय ३२ वर्ष रा कुरकुंभ ता दौंड जि पुणे हे खाली बसून चिलीम द्वारे गांजाचे सेवन करीत असताना मिळून आलेच्या कारणावरून त्याच्या विरुद्ध आमली पदार्थविरोधी कायदा कलम १९५८ चे कलम ८ (क) २७ नुसार सरकारतर्फे तर्फे फिर्याद आहे.
दाखल अंमलदार पोलीस हवालदार निकम. अंमलदार पदवीधर तपासी अंमलदार पोलीस कॉ महादेव जाधव पुढील तपास करीत आहेत








