श्रावण मास समाप्ती निमित्त ६ हजार ८३९ भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
तालुका प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
माहूर : श्रावण मास समाप्ती निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने भाविकांसाठी भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल ६ हजार ८३९ भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
अन्नदानाच्या कार्यक्रमापूर्वी संस्थानच्या वतीने दत्त शिखर येथील महापुरुषांची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी मा. तहसीलदार जगताप सर, संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कानव, दुर्गदास भोपी, आशिष जोशी, बालाजी जगत, अरविंद देव, मुख्य पुजारी भावणीदास भोपी, शुभम भोपी, व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल. योगेश साबळे , अरविंद राठोड, सुरक्षा अधिकारी महादेव मुंढे यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापुरुषांचे विधिवत पूजन झाल्यानंतर परशुराम मंदिर परिसरात भाविकांसाठी श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. अन्नदानाचे नियोजन अरुण घोडेकर व आकाश वानखेडे यांनी केले. तसेच साडी वाटपाचे नियोजन श्रावण जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक विजय राऊत, अरविंद राठोड, विष्णू चव्हाण, श्रावण जाधव यांच्यासह संस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. सुरक्षा रक्षक सुदर्शीग पवार, संदीप जबुतकर, हनुमान बेहेरे, चोले यांच्यासह सुरक्षा पथकाने उत्तम सुरक्षा व्यवस्था सांभाळली.
दरम्यान, महाप्रसादासाठी आलेल्या भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनोहर राठोड व शे. नब्बी यांनी सांभाळली. त्यामुळे भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी संस्थानच्या वतीने घेण्यात आली.
श्रावण मास समाप्ती निमित्त आयोजित या अन्नदानाच्या माध्यमातून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संस्थानच्या अधिकारी, विश्वस्त, पुजारी, कर्मचारी व सुरक्षा पथकाने केलेल्या नियोजनामुळे कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.








