गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न.!
बिलोली तालुका प्रतिनिधी गंगाधर कांबळे.
शंकर नगर-येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज शंकर नगरच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवास शाळेमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास डोळ्यासमोर ठेवून प्राचार्य डी. पी . पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वयंशासन दिवसाचे प्राचार्य रोशनी किरोले उपप्राचार्य दिनेश धुमाळे, अथर्व डवरे यांनी सकाळचे सत्र व दुपारचे सत्र अगदी उत्कृष्टतेने सांभाळले. जवळपास शाळेतील ५० विद्यार्थ्यांने सहभाग नोंदवून अध्यापनाचे ज्ञानरूपी कार्य व्यवस्थित रित्या सांभाळले.
प्राचार्य डी. पी. पांडेय यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्शन करताना म्हणाले विद्यार्थी सतत शिक्षणाच्या प्रवाहात राहिला पाहिजे तसेच आपल्या कर्तव्याची जाणीव प्रत्येकाला असायला पाहिजे आपले कर्तव्य आपण तितक्याच जिमेदारीने निभावले पाहिजेत तरच आपण आपल्या ध्येयाकडे पोहचू शकतो.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शाळेच्या वतीने प्राचार्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
स्वयंशासन दिनाच्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले त्यात प्राथमिक विभागामध्ये शेळके निकिता (प्रथम), पोटे गोपाल (प्रथम), शेळके आरती (द्वितीय), वागतकर दिशा (द्वितीय), तरटे सुजाता (तृतीय), शेळके समाधान (तृतीय) तर माध्यमिक विभागामध्ये पूसनाके संस्कृती (प्रथम), तर्फे सिद्धी (द्वितीय), तोरकड हर्षिता (तृतीय)
वरील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान कदम, अनुष्का किसवे तर आभार उर्मिला कदम यांनी केले.








