यावल शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला २५ सप्टेंबरपर्यंत स्थगिती
जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा; नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
यावल : यावल शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईला तूर्तास २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्थगिती देण्यात आल्याने अतिक्रमणधारकांसह शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटविण्याची कारवाई काही काळ पुढे ढकलावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अतिक्रमणधारकांकडून करण्यात आली होती.
यासंदर्भात तहसीलदार, यावल पोलीस ठाणे तसेच प्रांताधिकारी, फैजपूर यांना निवेदन देण्यात आले होते. पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी असे महत्त्वाचे सण-उत्सव सलग येत असल्याने या काळात अतिक्रमण हटविल्यास अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवू शकते, अशी भूमिका नागरिकांनी मांडली होती.
अनेक अतिक्रमणधारकांचे व्यवसाय हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रशासनाने मानवी आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून कारवाईला मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील आणि नगरसेवक अतुल पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे अतिक्रमणधारक तसेच शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला आश्वासन दिले आहे की, मुदत मिळाल्यानंतर आवश्यक ते अतिक्रमण स्वतःच्या खर्चाने काढून घेण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या मुदतीचा योग्य प्रकारे उपयोग करून सहकार्य करावे,








